सक्षात सुधीर फडके, "साक्षात" असे म्हणायचे कारण कि शुद्ध मराठी माणूस व अत्यंत प्रतिभावान गायक-संगीतकार, यांनी असे म्हंटले आहे कि चाली लावायच्या द्र्ष्टीने हिंदी गाणी जास्त सोपी असतात, कारण ती भाषाच मुळात जास्त गोड आहे. त्यांनी पुढे असे ही म्हंटले कि "भाभी कि चूडियां" च्या प्रचंड यशा नंतर ही (ज्योती कलश छलके; लौ लगाती गीत गाती; इत्यादी) त्यांना हिंदी सिनेमात फार काम मिळाले नाही कारण त्यांच्या कपाळावर एकदा मराठीचा शिक्का बसला तो कायमचाच.  मराठीची गोडी काय वर्णावी. उदाहरणार्थ मानापमान  मधले पद (हे चित्रपट गीत नाही, नाट्य पद आहे, तरी)
दे हाता या शरणागता ।
मदविलसित नदगता पंकयुता मुखमलिना धना हो त्राता ॥

संपदा चपलचरणा । आपदा भोगि नाना । परत ये पद्मसदना ।
कुवलय तव मुख तिला, अजि कमला विनवि तुला, मला घे आतां ॥


बापरे !! सगळे काही मराठीतच असले पाहिजे असा हेका धरणार्यांची "कृपा दृष्टी" अजून शास्त्रीय संगीता कडे वळली नाही हे आमचे परम भाग्य. अन्यथा बडे गुलाम अली खां यांची ठुमरी "याद पिया की आये" ही पुण्यात गायची झाल्यास "आठवण प्रियकराची येतेय" अशी; व "हूं  तो तोरे कारन जागी" ही देसकार मधली प्रसिद्ध बंदिश "मी तर तुझ्या मुळे जागी राहिले रे" अशी गावी लागली असती.