आंतरजालावर ङुलत्रुम असा शोध घेतल्यावर निदान चार-पाच साइट्सवर ङुलत्रुम हा शब्द सापडेल. 

एका आफ्रिकन राजकीय नेत्याचे नाव ङक्रु‌‌मा होते हे आठवावे. 

दार्जिलिंगचे खरे नाव दार्जि‌‌लीङ‌‌ आहे हे मला दार्जिलिंगमधील पोस्ट ऑफीसवरच्या पाटीवरून समजले.

 इंग्रजी भाषेच्या उच्चारकोशांत Going, Singing यांचे उच्चार गोइङ्, सिङिङ् (ˈsɪŋ.ɪŋ ) -  ( सिंगिंग ) असे सापडावेत. 

भारताच्या ईशान्य राज्यांमधील (निदान) पुरुषांच्या नावांमध्ये ङ हे अक्षर होते, असे अविनाश बिनीवाले यांच्या ' माय मरो पण..' या पुस्तकात वाचल्याचे स्मरते.