दार्जिलिंगचे खरे नाव दार्जि‌‌लीङ‌‌ आहे हे मला दार्जिलिंगमधील पोस्ट ऑफीसवरच्या पाटीवरून समजले

हे मात्र जरा अती झाले. गांगटोक -दार्जीलिंग-कालिंपोंग-फ़ुन्टशोलिंग (हे चौथे शहर भूटान मध्ये आहे)  या एरीयात  माझे सहा वर्षे वास्तव्य होते.  तेथील स्थानिक सर्वच जण या शहराच्या नांवाचा उच्चार दार्जीलिंग असाच करतात. दार्जिलिंग पोस्ट ऑफीस करता पाटी  रंगविणार्याला नेमके काय लिहायचे ते तेथील पोस्ट-मास्तराने किंवा कारकुनाने लिहून दिले व त्याने ते तसे रंगविले. अश्या पाट्या वाचून उच्चार ठरविल्यास मराठीत milk ला दुध (र्हस्व दु) म्हणतात, व will get याचा मराठी शब्द मीळेल  (दीर्घ मी) आहे असे म्हणावे लागेल, कारण पुण्यात बहुतेक पाट्यांवर "येथे गायीचे ताजे दुध मीळेल" असेच लिहिलेले असते.