मनोगताच्या शोध-यंत्रातून ही रेसिपी सापडली.  

रेसिपी आणि चित्र छान. 'यथा-शक्ती' हा शब्दप्रयोग आवडला. मी देखील मोदक वळलेले आहेत, आणि मी वळलेले मोदक जास्त चांगले 'दिसतात' अस म्हटलं जाई. पण सुरुवातीचा पेशन्स संपला की मग मोदकांचे आकारही बदलु लागत हा स्वानुभव आहे. पण स्त्रियांनी पति-पुत्र-मित्र इत्यादिकांना यथाशक्ती या कामाला लावायला हरकत नाही. या कामात पदार्थ बिघडण्याचा धोका त्यातल्या त्यात कमी. 

*** शंका - 
११ मोदकांसाठी दीड वाटी खोबरे असे दिले आहे, म्हणजे साधारण किती नारळ (मध्यम आकाराचा) लागेल? वाटीचा अंदाज आपापल्या वाट्यांप्रमाणे बदलू शकतो, म्हणून हा प्रश्न. 
उत्तर याच लेखिकेने द्यावयास हवे असे नाही, कोणत्याही सुगरणीने किंवा सुगरणाने दिले तरी चालेल. 

भाषिक शंका - सुगरण शब्दाची उत्पत्ती काय असावी?