भारताच्या  मणिपूर राज्यातल्या उख्रूल जिल्ह्यात तांखुल नावाची भाषा बोलली जाते.  अविनाशच्या  बिनीवाले यांच्या 'माय मरो पण...'  नावाच्या पुस्तकात तांखुलवर एक प्रकरण आहे.  त्या प्रकरणातील काही ङयुक्त वाक्ये :-

१, उख्रूलला पोहोचलो तेव्हा ङचेख मला  न्यायला आला होता.

२. थेट तिच्याजवळ जात मी विचारले, "आवा, मारिङ् फाली ? " - मावशी, बरी आहेस ना गं तू ?

३. मध्यंतरी निङतानला एक हरिण मिळाले होते.

४,. कोण नाही म्हणून सांगू ? आओ आहे, अंगामी आहे, माओ आहे, झिलिआङसुद्धा आहे.


बाङलाप्रमाणेच पुश्तू, तांखुल, मैते, आणि कोन्याक या भारताच्या वायव्य-ईशान्येला  बोलल्या जाणाऱ्या भाषा संस्कृतोद्भव  आहेत, असेही त्या पुस्तकात सूचित केले आहे.