छान नाट्य , आणि ओघवता अनुवाद (म्हणजे असावा). खरच, एवढ्या थोड्या अवकाशात खूप काही कळून येत या तीन पात्रांबद्दल. एकूणच खूप नाट्यमय आहे. आपल्याकडे दिवाकरांच्या नाट्यछटा असायच्या, थोडं फार तसं आहे. फक्त दिवाकरांच्या नाट्यछटेत दुसरं पात्र दृष्य होत नाही. शिवाय, आता नीट आठवत नाही, पण दिवाकरांच्या नाट्यछटा - बहुधा शालेय काळात वाचनात आलेल्या - थोड्या फार 'बेसिक' वाटल्या होत्या. हे नाट्य नक्कीच जास्त वरच्या दर्जाचं वाटतं.