अपवादांची वर्गवारी करण्याची समाजाची सवय तशी फारच जुनी. महिला शक्यतो घरातच राहणार. घराबाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर तसा प्रसंग आला तरच. म्हणजे झाशीची राणी ही शूर लढवय्यी असे आपण म्हणतो पण ती तशी का? तर तिचे पती गंगाधरपंत (जे तिच्याहून चाळीस एक वर्षांनी मोठे) यांच्या मृत्यूनंतर तिला अकाली वैधव्य आल्यावर राज्याचे रक्षण करण्याकरिता. कारण तिचा पुनर्विवाह होऊन तिच्या नव्या पतीला राज्याचा रक्षणकर्ता बनण्याची संधी देणंही परंपरेला मंजूर नाहीच. त्यापेक्षा अपवाद म्हणून तिलाच रणरागिणी बनविणं समाजाला जास्त सोयीस्कर आणि म्हणूनच राणीला श्रेयस्कर. पण या श्रेयाची धनीण होताना राणीला वयाच्या बाविशीतच मृत्यूला सामोरं जावं लागून फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कोणी ध्यानात घेत नाही.
झाशीची राणी लम्क्ष्मीबाई ही लहान असल्यापासून नानासाहेब पेशव्याच्या कुटुंबासोबत वाढलेली होती. तिने युद्धकलेचे, घोडेस्वारीचे शिक्षण लहान असतानाच घेतले होते. गंगाधरपंतांच्या मृत्यूनंतर ती (वडील मोरोपंत तांब्यांच्या सल्ल्याने) कारभार पाहू लागली. इंग्रजांनी तिचा दत्तक वारस मंजूर केला असता तर तिने कदाचित शस्त्र हाती घेतलेही नसते. पण इंग्रजांनी सालिना ६००, ००० रुपये पेन्शनच्या बदल्यात तिने झाशी सोडावी असा प्रस्ताव मांडला, तो तिला मंजूर नसल्याने तिने हातात शस्त्र घेतले. मोठा पराक्रम गाजवला आणि स्वातंत्र्यासाठी जिवाची किंमत मोजली. त्यामुळे समाजाने तिला आपल्याला सोयिस्कर म्हणून रणरागिणी बनवले हा युक्तिवाद चुकीचा आहे. रणरागिणी न बनताही तिला पेन्शन घेऊन झाशी सोडून रहायचा (आणि स्वतःचा जीव वाचवायचा) पर्याय उपलब्ध असतानाही होता होईतो झाशीचे इंग्रजांपासून रक्षण करेन, त्यासाठी मरण आले तरी बेहत्तर अशी भूमिका घेऊन ती निभाऊन दाखवली यात तिचे मोठेपण आहे. स्वातंत्र्याची उर्मी ही आतून येते, समाजाला किंवा इतर कोणाला सक्ती करता येत नाही.
पुनर्विवाहाचा मुद्दा इथे कसा लागू होतो समजले नाही. राणीचे वय मृत्यूसमयी किती होते हाही वादाचा मुद्दा दिसतो. ज्या विकीपीडियाचा संदर्भ तुम्ही देत आहात त्यानुसार तिचे वय ३० वर्षांचे होते.
असो.