इंग्रजी विकीपीडियानुसार तिचा जन्म १८२८ मधला दिसतो. म्हणजे मृत्यूसमयी तिचे वय ३० वर्षांचे होते.

 दत्तक वारस नामंजूर केल्याने तिने शस्त्र हाती घेतले हे आपण मान्य करीत आहातच ना.  पुनर्विवाह केला असता तर दत्तकाचा प्रश्न न उद्भवता स्वतःचा जन्मलेला पुत्रच वारस होऊ शकला असता.  तोही इंग्रज सरकारने अमान्य केला असता तर नव्या राजाला इंग्रजांबरोबर लढायला लागले असते.  इतक्या कोवळ्या राणीवर ही पाळी येऊन अकाली मृत्यू पत्करावा लागला नसता.

पुनर्विवाह केला असता तरी १. मुलगा किंवा मुलगी काहीच झाले नसते, २. फक्त मुलीच झाल्या असत्या किंवा ३. मुलगा होऊन पहिल्या मुलाप्रमाणेच अल्पायुषी निघाला असता किंवा ४. मुलगा शिवाजीच्या वारसांसारखा वेडसर निघाला असता, तर काय झाले असते? यापैकी काहीही झाले असते तरी इंग्रजांनी संस्थान खालसा केलेच असते. तिच्या पतीला लढावे लागले असते  हे जरी खरे असले तरी पतीने न लढता पेन्शन घेऊन झाशी इंग्रजांना दिली असती तर राणीने काय केले असते? नवऱ्याच्या निर्णयाविरुद्ध ती इंग्रजांविरुद्ध लढली असती असे तिचे चरित्र /स्वभाव लक्षात घेता म्हणता येते.

इतक्या कोवळ्या राणीवर ही पाळी येऊन अकाली मृत्यू पत्करावा लागला नसता.

"लाईफ इज अबाउट चॉईसेस" असे इंग्रजीत म्हणतात. तिने सालिना ६०,००० रु. पेन्शन घेऊन झाशी इंग्रजांना दिली असती तरीही मृत्यू टळला असता. मी तर तिच्या मृत्यूबद्दल राणीलाच दोष देईन. त्या काळी ६०,००० रुपये ही काय कमी रक्कम होती? जगली असती चांगली ८०-९० वर्षे. केले असते यज्ञ, दानधर्म, ब्राह्मणभोजने. आपले रावबाजी नाही पेन्शन घेऊन ब्रह्मावर्तास जाऊन बसले? चांगले ७६ वर्षे जगले. नाहीतर त्याचे युद्ध करणारे त्याचे पूर्वज चाळीशीच्या आतच स्वर्गवासी झाले. उगीच स्वातंत्र्य वगैरे अब्स्ट्रॅक्ट कल्पनांच्या मागे लागून युद्ध वगैरे करून हौताम्य पत्करायचे याला काय अर्थ आहे?.