अनुवाद छान झाला आहे. आवडला. (फक्त "... माल भारी आहे"  हा अनुवादाच्या भाषाशैलीशी प्रथमदर्शनी विसंगत वाटणारा वाक्यांश वाचताना खटकला. मूळ कथा वाचली तेव्हा "माल अच्छा है"चा अनुवाद असल्याचे कळले, व त्या दृष्टीने तो चूक नसल्याचेही जाणवले. परंतु आजकाल मराठीत "माल भारी आहे"ला जो अर्थ चिकटलेला आहे तो तुमच्या अनुवादाला अभिप्रेत नसलेल्या एका भलत्याच अर्थाची आठवण करून देतो.  )