कथा आणि अनुवाद आवडले. 'म्हैस' ची आठवण झाली.
फणसेंच्या 'माल भारी आहे' वरून आठवले. हिंदी आणि मराठीतल्या शब्दांच्या अर्थाबाबत असा गोंधळ होणे स्वाभाविक असते. काँग्रेसचे दिग्विजयसिंग यांनी त्यांच्या पक्षातल्या एका महिलेबद्दल 'यह सौ टंच माल है' असे उद्गार काढले होते आणि त्यावरून बराच गदारोळ झाला होता. 'टंच' या  शब्दाचा मराठीतला अर्थ ध्यानात घेऊन महाराष्ट्रातल्या (विरोधी पक्षातल्या- अर्थात! ) महिला त्यावर तुटून पडल्या होत्या. दिग्विजय सिंगाचा वाचाळपणा ध्यानात घेऊनही त्यांनी वापरलेल्या वाक्प्रचाराचा हिंदीतला अर्थ अगदी सभ्य आहे. यातायात, शिक्षा या  शब्दांच्या मराठी आणि हिंदी अर्थातले फरक सुपरिचित आहेत. कानडी, बंगाली भाषांबाबतही असे होते. शोकसभेला कानडीत (की बंगालीत? ) संताप सभा म्हणतात. मुखंड या शब्दाचा कानडीतला (की बंगालीतला) अर्थ अगदी चांगला आहे, वगैरे.