आपण लिहिलेले अनुभवाचे बोल आहेत हे नक्की. ज्योतिषशास्त्र या विषयावर बरेच ग्रंथ तयार होऊ शकतील. कारण याचा प्रत्येक अभ्यासक 
स्वतःचा मार्ग शोधून काढतो. आणि जगात  प्रत्येक मार्गाला मानणारा कोणी ना कोणी तरी निघतोच. आपण कितीही नावं ठेवली तरी. मी स्वतः 
ज्योतिष पाहतो. पण मी कधीही कोणत्याही ज्योतिषाकडे अजून गेलो नाही. कारण माझा स्वतःचाच या शास्त्रावर पक्का विश्वास नाही. त्यामुळे मी 
कोणतीही अंधश्रद्धा पसरवीत नाही. तरीही लोकांचे ज्योतिषाचे अनुभव सगळ्याच  ज्योतिषांनी वाचावेत हे बरं. असो. लेख फारच रंजक आहे.