मूळ कथेच्या दुव्यासाठी धन्यवाद. अनुवाद छानच झाला आहे.

आणि खर सांगायचं तर 'माल भारी आहे' हा शब्दप्रयोग प्रथमदर्शनी मलाही किंचित खटकला होता, पण शेवटी मला हेच भाषांतर जास्त समर्पक वाटते. 'खास बेत' वगैरे पण चांगलं आहे, पण 'माल भारी आहे' मध्ये मांजरीचा बनेल भाव जास्त चांगला व्यक्त होतो, जो येथे अभिप्रेत आहे. नाही तर हिंदीत सुद्धा माल शब्द वापरण्याची तशी गरज नव्हती. 'कुछ खास है' अस काहीतरी (कॅडबरीच्या चालीवर) म्हणता येऊ शकलं असतं. शिवाय कथेच्या भाषांतरात थोडातरी मूळ संस्कृतीचा आणि भाषेचा, आणि त्याहूनही शैलीचा लहेजा टिकवून ठेवलेलाच चांगला वाटतो.