आपला लेख वाचून सर्वप्रथम कुठली भावना मनात आली असेल तर ती आश्चर्याचीच.
आधी हे नमूद करतो की माझा देखील भविष्य, ज्योतिष या बाबींवर विश्वास नाही. तरीही प्रसंगानुरुप कधी कुणाच्या आग्रहाने भविष्य पाहिले गेले आहे. १२ मे २००८ रोजी एका प्रसिद्ध ज्योतिष्यांनी मला ०७ जुलै २००८ ते २० जुलै या कालावधीत जीवघेणे संकट सामोरे येईल, कदाचित मृत्यू संभवेल, किंवा वाचलो तरीही मोठा फटका बसेल हे भाकीत वर्तविले होते. प्रत्यक्षात माझा २२ मे २००८ रोजी गंभीर अपघात झाला. भविष्य वर्तविताना १४ दिवसांचा कालावधी दिला होता तरी प्रत्यक्षात त्या आधीच दीड महिना माझा अपघात झाला ही भविष्य वर्तविण्यातली चूकच म्हणावयास हवी. याच ज्योतिषी महोदयांनी माझा वयाच्या साडे छप्पन्नाव्या वर्षी म्हणजेच डिसेंबर २०३४ मध्ये नक्की मृत्यू होईल असे भाकीत वर्तविले आहे. आता त्याची सत्यता पडताळण्याकरिता अजून वीस वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
दुसऱ्या एका हौशी ज्योतिष्यांनी माझे व्यावसायिक कारकीर्दीविषयीचे भविष्य वर्तविले होते. ऑगस्ट २०१२ ते मे २०१४ पर्यंतच्या कालावधीत हे भाकीत अगदी तंतोतंत खरे ठरले. परंतु जून २०१४ पासून हे भविष्य अगदीच चूकीचे ठरले आहे असे मला अनुभवास येत आहे.
आपण आपल्या मित्राचे तारीख व वेळेनुसार अगदी नेमके भविष्य वर्तविले आणि ते अचूक ठरले आहे याचे आश्चर्य वाटले.