सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे. साफ चूक. २०१३ साली दिल्ली विधान सभा निवडणूकीत AAP पक्षा कडून अनेक सामान्य माणसे उभी राहिली, व दिल्ली जनतेने त्यांना सर्वात मोठ्या संख्येने निवडून पण दिले. तेव्हां आता तरी हे मान्य व्हावे कि सदर लेख चर्चा तद्दन नकारात्मक व निराशावादी भूमिकेतून झालेली आहे.  त्या नंतर २०१४ लोकसभा निवडणूकीत लोकांनी मतदान करून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात "कसला डोंबलाचा सकारात्मक बदल ? मोदी सरकार येवून शंभर दिवस झाले तरी महागाई कमी झालेली नाही; मेळघाटात कुपोषण आहेच; भ्रष्टाचार - खून - बलात्कार होतच आहेत; चीन अजून वाकुल्या दाखवीतच आहे;" वगैरे म्हणायला तुम्ही मोकळे आहातच. मुळात मुद्दा असा आहे "मी म्हणे स्वस्थ राहावे, जे काही नकारात्मक तेवढेच फक्त पहावे"