>>>> एक कुशंका!
- समजा तुमच्या मित्राने तुमचा सल्ला एकला असता आणि त्वरित नोकरी बदलली असती, तर नवीन नोकरीत बडतर्फिची शक्यता किती होती? <<<
तसे होणार असते तर ....... प्रश्न कूडली द्वारे ते कळले असतेच. अशावेळी पहीली नोकरी सोडणे -> दुसरी नोकरी मिळणे -> दुसर्या नोकरीत बडतर्फी होणे असे योग दिसले असते ,यात शंकाच नाही. हे योग ठळक असतात , त्यांचा एक विविक्षित पँटर्न असतो आणि तो दिसला नाही असे होणारच नाही. (ज्योतिषी अनुभवी आहे हे ईथे गृहीत धरले आहे)
माझ्या कडे अशा तीन केसेस अशा आहेत ज्या मध्ये 'दोन महिन्यात विवाह आणि विवाहानंतर तीन- चार महिन्यात घट्स्फोट' असे स्पष्ट , खणखणीत योग दिसले होते .
जातकाच्या नशिबात बडतर्फीच होती म्हणूनच त्याने 'ईशारा / आगावू सूचना' मिळालेली असताना सुद्धा दुसर्या नोकरीचे प्रयत्नच केले नाही. समजा त्याच्या नशिबात - सल्ला मागायची ईच्छा होणे -> योग्य त्या ज्योतिषाची गाठ पडणे--> योग्य तो सल्ला मिळणे -> त्या सल्ल्यानुसार प्रयत्न /हालचाली करण्याची प्रेरणा मिळणे ' अशी घटनांची साखळी असती तर काय झाले असते? :जातक स्वत:हून नोकरी बदलेल असे ग्रहयोग दिसले असते ".
'दैव देत आणि कर्म नेते' , 'विनाशकाले विपरित बुद्धी' या म्ह्णी काही उगाच नाही प्रचारात आहेत !