<< सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे. साफ चूक.>>

हे मूळ विधान लोकसत्ताच्या अग्रलेखातील आहे. 

<< २०१३ साली दिल्ली विधान सभा निवडणूकीत AAP पक्षा कडून अनेक सामान्य माणसे उभी राहिली, व दिल्ली जनतेने त्यांना सर्वात मोठ्या संख्येने निवडून पण दिले. >>

साफ चूक.  दिल्ली जनतेने त्यांना स्पष्ट बहूमत दिलेच नाही.  म्हणूनच ज्या काँग्रेस पक्षावर टीका केली त्यांचाच पाठिंबा घेऊन सरकार बनविले आणि ४९ दिवसांत माकडचेष्टा करून पायउतार झाले.  शिवाय पुढे ह्या पक्षाने लोकसभेकरिता अंजली दमानिया, दीपाली सय्यद, जावेद जाफरींसारख्या कार्टून लोकांना उमेदवारी दिली ते सामान्य लोक होते असे आपणांस वाटते काय?  मूळात्त दीपाली सय्यद, जावेद जाफरी हे  प्रसिद्ध नसते तर त्यांना उमेदवारी मिळाली नसतीच.  निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात सेलिब्रिटींना उमेदवारी दिल्यामुळे आम आदमी पक्षातच टीकेचा गदारोळ झाला होता.  

<< त्या नंतर २०१४ लोकसभा निवडणूकीत लोकांनी मतदान करून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. >>

म्हणजे नेमके काय केले आहे?  कारण वर आपण ज्या आम आदमी पक्षाचा उल्लेख केला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी नरेंद्र मोदींवर देखील भ्रष्टाचाराचा आरोप करून गंभीर टीका केली आहेच.  विशेषतः  त्यांच्या अदानी व अंबानी सोबत असणाऱ्या जवळिकी बाबत.  भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना इतर पक्षांतून आयात करून उमेदवारी दिली आहेच.  तिकडे उत्तरेत देखील डी. पी.  यादव नावाच्या 'बाहूबली' नेत्याला पदराखाली घेतले आहे.  हा सकारात्मक बदल म्हणावा का?

<< तेव्हां आता तरी हे मान्य व्हावे कि सदर लेख चर्चा तद्दन नकारात्मक व निराशावादी भूमिकेतून झालेली आहे. >>

नाही मान्य होत.

<< मुळात मुद्दा असा आहे "मी म्हणे स्वस्थ राहावे, जे काही नकारात्मक तेवढेच फक्त पहावे"  >>

असे विधान लेखात कुठेही केलेले नाहीये.  फक्त मतदान न करणाऱ्यांवर टीका करण्यात अर्थ नाहीये हाच लेखाचा मुद्दा आहे.  मतदानाखेरीज इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.  मूळात मतदान करूनच सर्व काही साधता आले असते अण्णा हजारे सारख्यांना आंदोलने करावीच लागली नसती ही वस्तूस्थिती आहे.