साफ चूक. दिल्ली जनतेने त्यांना स्पष्ट बहूमत दिलेच नाही. हे काय नवीनच? राजकारणाचे "सामान्यीकरण" करण्याच्या प्रवासात सामान्य माणसांना उमेदवारी मिळणे हा टप्पा एक; त्यांनी निवडून येणे हा टप्पा दोन; अपवाद म्हणून दोन-चार नव्हे तर अनेक सामान्य माणसांनी निवडून येणे हा टप्पा तीन; स्पष्ट बहुमत मिळेल इतक्या संख्येने निवडून येणे हा टप्पा चार; दोन तृतियांश बहुमत हा टप्पा पाच; मग विधान सभेत ते काय कर्तुत्व गाजवतात (माकड चेष्टा, इतर काही चेष्टा) हा टप्पा सहा; वगैरे असे अनेक टप्पे करता येतील. "उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही" या शब्द योजनेत पुरेशी स्पष्टता आहे कि ते प्रतिपादन पहिला टप्पा नाकारण्या पुरतेच मर्यादित होते. त्या बाबत चर्चा पुढे नेताना "पण स्पष्ट बहूमत कुठे मिळाले ? आणि शेवटी त्यांनी माकड चेष्टाच केल्या; वगैरे गरज पडेल तसे सोयीस्कर अर्थ काढता येत नाहीत.
सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही याचा अर्थ एकाही सामान्य माणसाला उमेदवारी मिळणार नाही असाच होतो. इतका काटेकोर पणा सोडून तर्कात थोडी ढिलाई केली तरी लक्षणीय संख्येने उमेदवारी मिळणार नाही येवढा होईल. फक्त सामान्य माणसांनाच उमदेवारी मिळेल व एकाही सेलेब्रिटीला उमेदवारी मिळणर नाही असा अर्थ अजिबात होत नाही. AAP ने दोन चार नव्हे तर अनेक सामान्य माणसांना उमेदवारी दिली व सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही हे विधान सपशेल आपटले. काही सेलिब्रिटींना उमेदवारी दिल्याने ते उभे राहात नाही.
तुम्ही किंवा लोकसत्ताने फक्त सामान्य माणसांनाच उमदेवारी मिळावी व एकाही सेलेब्रिटीला उमेदवारी मिळू नये असे स्पष्ट विधान केलेले नाही, पण जर केले असते, तर हा प्रश्न आलाच असता कि असे का? सेलेब्रिटींनी असे काय घोडे मारले आहे कि त्यांना उमेदवारी नाकारावी ? व सामान्य माणसांनी असे काय दिवे लावले आहेत कि उमेदवारी फक्त त्यांनाच द्यावी?
सरकार बनविले आणि ४९ दिवसांत माकडचेष्टा करून पायउतार झाले. अगदी पुरेपूर मान्य. याचा अर्थ असा कि ज्यांना प्रशासनाचा काहीही अनुभव नाही; ज्यांची सु-प्रशासानाची व्याख्या केवळ "भ्रष्टाचार मुक्त प्रशासन " येवढीच आहे; व ते कसे साध्य करायचे याची समज "आमचा लोकपाल बिल मसुदा मान्य करा" येवढीच आहे, व त्या पलिकडे त्यांना ना काही दिसते ना उमजते; अश्या लोकांना निवडून आणण्यात काहीही अर्थ नाही. जनतेने योग्य तो बोध घेतला व लोकसभा निवडणूकीत सामान्य माणसांच्या पार्टीला धडा शिकविला.
त्या पक्षाच्या अध्यक्षांनी नरेंद्र मोदींवर देखील भ्रष्टाचाराचा आरोप करून गंभीर टीका केली आहेच. केजरीवाल यांना जो दिसेल त्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्या व्यतिरिक्त इतर काही करता येते का? उद्या तुम्ही AAP पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहिलात तर ते तुमच्या वर पण भ्रष्टाचाचे आरोप करतील. तेवढ्याने तुम्ही भ्रष्ट ठरत नाही. जनतेने त्या आरोपांना कचर्याची टोपली दाखविली.
मूळात मतदान करूनच सर्व काही साधता आले असते अण्णा हजारे सारख्यांना आंदोलने करावीच लागली नसती. आणि अण्णा हजारेंनी तरी आंदोलन, म्हणजे वारंवार आमरण उपोषण, करून नेमके काय साध्य केले ? एकूणच सर्व लेख व पत्र प्रपंचाचा सूर "च च च, सर्व पैश्याचा खेळ झालेला आहे, (ते सुद्धा खर्या नोटा नाहीत, खोट्याच :-) काहीही होणे शक्य नाही" असा नकारात्मक व निराशावादी आहे. "मग काय करावे" या वर मंथन नाही. मतदान करून काहीही साधता येत नाही असाही एक मतप्रवाह आहे, गडचिरोली, दंडकारण्य वगैरे जंगलात. तुम्ही त्याचे समर्थन करीत आहात का? असाल तर तसे स्पष्ट म्हणावे म्हणजे माझ्या सारखे या चर्चेतून वेळीच माघार घेतील.