इतक्या जोतिषांना का भेटलात याची उत्सुकता आहे.. (प्रश्न माझा नव्हे, हेमंत मुळे यांचा)

ते काय ठरवून भेटले ? त्यांच्या आणि ते ज्या ज्योतिषांना भेटले त्या ज्योतिष्यांच्या दोघांच्या कुंडलीत अशी भेट होणार असे विधीलिखीत होते, म्हणून त्या भेटी झाल्या. एकदा का हे ठरले कि सर्व काही विधिलिखीत असते, कि आयुष्य फार सोपे होते. आता माझेच बघा. माझा "सर्व काही विधीलिखीत आहे", व भविष्या कथन या दोन्ही वर अजिबात विश्वास नाही. आणि या दोन्ही वर गाढ विशवास असलेला माझा एक मित्र माझ्या या अ-विशवासा करता माझ्या वर जाम चिडत असे, माझे व त्याचे सारखे वाद होत असत.  मग मला एक युक्ती सुचली. मी त्याला म्हंटले - अरे, विश्वास ठेवावा कि न ठेवावा हे ठरविणारा मी कोण ? माझा तसा विश्वास असणार नाही असे विधिलिखीतच आहे. म्हणजे असणारच.  त्याशिवाय का माझा विश्वास नाही ? हे त्याला पटले का नाही पटले हे कळायला मार्ग नाही. पण तो निरुत्तर मात्र झाला व आमचे या विषया वरील वाद विवाद बंद झाले.  

असो. तुमच्या एका मित्राने दिल्लीला बदली होईल का असा प्रश्न विचारला व तुम्ही त्याची नोकरीच जाणार असे अगदी तारीख-तास-मिनिट पर्यंत अचूक असे भविष्य कथन केले. माझा पण एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात आता होऊ  घातलेल्या निवडणुकात कोणत्या पक्षाला किती सिटा मिळतील ? निवडणुकींची घोषणा झाली आहे, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख  उलटून गेली आहे, व म्हणून प्रश्न आता valid आहे. या प्रश्नाचे उत्तर निकाल जाहीर होण्या पूर्वी अपेक्षित आहे. मी २३७ हा आकडा तुम्हाला देतो. उतस्फूर्त पणे मनात आलेला. तुमची काही फी असल्यास ती किती ते कळवावे. मला शक्य असल्यास (म्हणजे तसे विधिलिखीत असल्यास) देईन.