<< मतदान करून काहीही साधता येत नाही असाही एक मतप्रवाह आहे,  गडचिरोली, दंडकारण्य वगैरे जंगलात. तुम्ही त्याचे समर्थन करीत आहात का? >>

मी असे कुठलेही समर्थन केलेले नाहीये.  ज्यांना मतदान करावयाचे आहे त्यांनी ते अवश्य करावे.  जे करत नाहीत त्यांनाही न करण्याचे स्वातंत्र्य असावे.  त्यांच्यावर टीका करू नये हाच लेखाचा मुद्दा आहे.  गडचिरोली, इत्यादी नक्षलग्रस्त भागांमध्ये इतरांनाही मतदान करण्यापासून परावृत्त केले जाते तो माझ्या लेखाचा सूर नाही.

<< असाल तर तसे स्पष्ट म्हणावे म्हणजे माझ्या सारखे या चर्चेतून वेळीच माघार घेतील.>>
चर्चेतून माघार घेण्याकरिता पळवाट शोधू नका.  तुम्ही अडचणीच्या मुद्द्यांना बगल देत तसेही चर्चेतून माघार घेत आहातच की. 

भाजप विषयी मी मांडलेली ही विधाने आपण पाहिली नाहीत काय?

विशेषतः  त्यांच्या अदानी व अंबानी सोबत असणार्‍या जवळिकी बाबत.  भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना इतर पक्षांतून आयात करून उमेदवारी दिली आहेच.  तिकडे उत्तरेत देखील डी. पी.  यादव नावाच्या 'बाहूबली' नेत्याला पदराखाली घेतले आहे.  हा सकारात्मक बदल म्हणावा का?

याविषयी आपण आपले मत मांडलेले दिसत नाहीये.