<<अण्णांनी दिल्लीत अनेकदा तब्येत साथ देईल तेवढ्या दिवसांचे आमरण उपोषण करून पाहिले पण काही साध्य झाले नाही.>>
दिल्लीतल्या उपोषणा आधी अण्णा हजारेंनी महाराष्ट्रात देखील आंदोलने केली आणि माहिती अधिकाराचा कायदा करून घेतला. हे निव्वळ मतदानाने साध्य होऊ शकले असते काय?
<< माथेफिरू सोडले तर लोकशाही प्रक्रियेत सर्वच जण विषवास व्यक्त करतात. >>
तुम्हाला ज्या प्रक्रियेवर विश्वास वाटतो त्यावर इतरांनी विश्वास न ठेवल्यास ते माथेफिरू आहेत अशी अश्लाघ्य भाषा वापरणे हा हेकेखोरपणा झाला. किंबहूना अशी भाषा वापरून तुमचा लोकशाही मूल्यांवर विश्वास नसल्याचेच तुम्ही सिद्ध करत आहात. अशी भाषा वापरणाऱ्यांसोबत चर्चा कशी करायची? तुम्हाला न पटणारा मुद्दा मांडला की तुम्ही समोरच्याला माथेफिरू म्हणणार.
<< पण
तुमच्या मते मतदान करून ही काही साध्य होत नाही. मग तुमच्या मते काय करावे ?
फक्त "च् च् च्" करीत बसणे ? >>
तुम्ही लेख संपूर्ण वाचला असता तर तुम्हाला हा प्रश्न पडलाच नसता. २००४ अखेरीस राज्यात निवडणूका झाल्यात तेव्हा नवीन सरकारकडून जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी काही अपेक्षा मांडल्या होत्या. त्या लोकसत्तामार्फत तत्कालीन माननीय मुख्यमंत्री दिवंगत श्री. विलासराव देशमुख यांचेपर्यंत पोचविल्या गेल्या. त्यानंतर जानेवारी २००५ मध्ये मी व इतर आठ प्रतिनिधी लोकसत्तामार्फत मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या वर्षा ह्या निवासस्थानी भेटलो, आमच्या मागण्यांबाबत एक तास अर्चा केली. या बाबीचा उल्लेख मी माझा मित्र मंदार मोडक यास लिहिलेल्या प्रत्युत्तरात आहेच. खेदाची बाब ही की आम्ही मांडलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याबाबत पुन्हा लोकसत्ताने पुढाकार घेतला नाही.
माझ्या लेखातील हा भाग पुन्हा वाचावा.
<< माझ्या मते सरकार कुणाचे येते ते महत्वाचे नाही (कारण सार्यांची नियत आणि
कुवत सारखीच). आपण त्यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडणे आणि त्यांचा
पाठपुरावा (Follow-Up) करणे महत्त्वाचे. पाच वर्षांपुर्वी आपण अशाच आपल्या
मागण्या लोकसत्तामार्फ़त मांडल्या आणि आपल्याला माननीय मुख्यमंत्री श्री.
विलासराव देशमुखांबरोबर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी चर्चेची संधी
मिळाली. आपली ओळखही त्या निमित्तानेच झाली.
आताही तू म्हणतोस तसे आघाडीचेच सरकार आले आणि पुन्हा विलासरावच
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले तर लोकसत्ताने आपल्याला पुन्हा एकवार
चर्चेची संधी द्यायला हवी. पुर्वीच्या मागण्या कितपत पुर्ण झाल्यात याचाही
ऊहापोह करता येईल. तू मुंबईतच राहतोस तेव्हा शक्य असल्यास कुमार केतकरांची
भेट घेऊन ही मागणी करावीस असे मला वाटते. माझ्या आठवणी प्रमाणे तू तेव्हा
चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक लिहून
घेतले होतेस तेही केतकरांना देऊ शकतोस. मला वाटते सारे जण अत्यंत आनंदाने
पुन्हा सामील होऊ शकतील.>>
" फक्त "च् च् च्" करीत बसणे " हे न करता मी सूचविलेला हा ठोस उपाय आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी वाचला नाही याचे सखेद आश्चर्य वाटले.