<< अनिल अंबानी मोदींसोबत झाडू मारायला का आले होते?  आरोप तुम्ही केला आहे, तेव्हा तो स्पष्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे.  >>

आरोप मी नाही तर ज्या आआप चा दाखला आपण लोकसत्ता च्या अग्रलेखातील मुद्दा खोडून काढण्याकरिता दिला होता त्या आ आ प  च्या अध्यक्षांनी केले होते.  त्यावर मोदींनी स्पष्टीकरण दिले नाही शिवाय शासकीय कार्यक्रमाला अनिल अंबानींना जवळ करून आरोपांना पुष्टी देण्याचाच प्रयत्न केला आहे. 

खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारून उघडणारा लेख वाचा.  जवळिकीचा आरोप अजूनच स्पष्ट होईल. 

दुवा क्र. १

कर्ज बुडविण्यात अग्रणी असणाऱ्या उद्योगपतींना शासकीय कार्यक्रमात जवळ करणे योग्य नव्हे.

<< वायुचे दर वाढणार हे यूपीए सरकारच्या काळा पासून निश्चित आहे.>>

अंबानींसोबत जवळीक असल्याचा आरोप आआपने  काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांवर केला आहे, तेव्हा यात विशेष असे काहीच नाही.