पण तुम्ही जो दुवा दिला आहे तो शंतनुराव किर्लोस्करांच्या 'कॅक्टस ऍण्ड रोझेस' या आत्मचरित्राचा आहे (ज्याची पीडीईफ माझ्याकडे आहे).
मी उल्लेख केलेले 'यांत्रिकाची यात्रा' हे शं. वा. किर्लोस्करांनी (शंतनूरावांचे बहुधा चुलत बंधू) लिहीलेले लक्ष्मणराव किर्लोस्करांचे - किर्लोस्कर समुहाचे आद्य प्रवर्तक - चरित्र आहे. या पुस्तकातील एका प्रकरणावरून घेतलेला धडा महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बालभारतीतही एके काळी होता हेदेखील काहींना आठवेल.
पण आपल्या त्वरित सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.