कादंबरी दूर्मिळ आहे. अक्षरधाराच्या प्रदर्शनातून मी शेवटच्या चार प्रती विकत घेतल्यात. पुस्तके अतिशय खराब अवस्थेत आहेत. त्यांना व्यवस्थित चिटकवून घ्यावे लागले. त्यानंतर मित्राला वाचण्याकरिता ह्य पुस्तकाची एक प्रत दिली. परंतु, १२८ पानांची ही वैज्ञानिक भाषेतील कादंबरी त्याने वाचलीच नाही. तेव्हा जेमतेम १२ पानांत हे सारांश रुपाने रसग्रहण लिहीले. हे एकदा वाचले की पुन्हा पुस्तक वाचायची गरजच उरत नाही.
अर्थात तुम्हाला मूळ पुस्तक वाचायचे असेल तर ते कदाचित फ्लिपकार्टवर मिळू शकेल, पण आधी सांगितले तसे प्रत खराब अवस्थेत असेल, कदाचित सर्व पाने देखील उपलब्ध नसतील.