मला वाटतं, साहित्य संमेलनं भरवणं हादेखील मनरेगाचा एक उपक्रम म्हणून राबवण्यास आता हरकत नसावी. बाकी मराठीत आता लवकरच साहित्य थोडे आणि संमेलनेच फार अशी परिस्थिती आल्यास आश्चर्य वाटू नये.
पण शेतकरी साहित्य संमेलनच कशाला, कोणत्याही मराठी साहित्य संमेलनातून आजपर्यंत काय साध्य झाले, इतकच कशाला, काही साध्य व्हावे अशी अपेक्षा तरी होती का, आणि त्यासाठी काही योजना होती का, हा नक्कीच संशोधनाचा विषय होऊ शकेल आणि या वर निदान १०-१५ पीएच्ड्या तरी व्हायला हरकत नसावी. १०-१२ वर्षांपूर्वी बहुधा कऱ्हाड साहित्य संमेलनात माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी एक अप्रतिम भाषण केले होते, जे नंतर मौज दिवाळी अंकातून प्रसिद्धदेखील झाले होते. ते वगळता अलीकडच्या पलीकडच्या अनेक वर्षांत काही लक्षणीय झाल्याचे ऐकिवात तरी नाही. दर वर्षी जगभर एवढी संमेलनं भरवून हे मराठी साहित्यिक नेमकं काय साधतात, तेच जाणोत !!