पण शेतकरी साहित्य संमेलनच कशाला, कोणत्याही मराठी साहित्य संमेलनातून आजपर्यंत काय साध्य झाले ?
अगदी बरोबर. साहित्य संमेलनांतून "साहित्य" हा शब्द वगळून त्यांना केवळ संमेलन म्हणावे अशी परिस्थिती आहे. आधीच अशी ढीग भर संमेलने आहेतच. मुटे यांनी त्यांच्या सूतोवाच मध्ये अनेकांचा उल्लेख पण केला आहे. व त्या संमेलनातून पुढार्यांना व काही वक्त्यांना मिरवण्याची एक संधी, व इतरांना चार दिवस रूटीन मधून ब्रेक या पलीकडे काहीही साध्य होत नाही हे आता सर्वांना माहीत असलेले सीक्रेट आहे. म्हणूनच आणखीन एक संमेलन केल्याने काय साधणार आहे हा प्रश्न विचारावा लागतो. कोणताही उपक्रम सफल झाला का हे ठरवायचे निकष काय, हे तो उपक्रम हाती घेण्या आधी ठरवायचे असते. मुटे यांना शेतकरी साहित्य संमेलन (म्हणजे जे काय असेल ते) करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी आपण होऊन हा विषय सर्वां समोर मांडला म्हणून मी काही प्रश्न विचारले, कि शेतकरी साहित्य म्हणजे नेमके काय, व संमेलनाचा उद्देश काय.