कॉग्रेसमुक्त भारत हे मोदींचे आजचे धोरण असले तरी या धोरणाचा  पाया घालणाऱ्यांमध्ये बाळासाहेब असून त्यांचे याबाबतीतील  योगदानाचे विस्मरण मोदींना कधीही झाले नाही हे सातत्याने जाणवत होते.

शिवसेनेच्या स्थापनेमागे काँग्रेस आहे अशी बोलवा १९६६ पासून आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने मराठी लोकांपुरती भूमिका अधिकृतपणे घेता येत नसल्याने वसंतराव नाईकांच्या पाठिंब्याने शिवसेना निर्माण झाली असे बोलले जायचे. आधी वसंतराव नाईक आणि नंतर वसंतदादा पाटील यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेला "वसंतसेना" म्हणत. १९८० मध्ये काँग्रेस - शिवसेना युती होती, अंतुल्यांना बाळासाहेबांचा पाठिंबा होता.  पुढे केव्हातरी बाळासाहेबांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे बाळासाहेबांबद्दल आदर असला तरी इतिहास नजरेआड करून चालणार नाही. जनसंघ/भाजप मात्र स्थापनेपासून सातत्याने काँग्रेसच्या विरुद्ध होता.