झालेले सर्वेक्षण किती दिवस आधी झाले हे आज तरी सर्वेक्षण करणार्यांनी सांगितलेले नाही. नुकतेच जे सर्वेक्षण कौल प्रसिद्ध झाले आहेत ते "एक्झिट पोल" आहेत, म्हणजे मतदान झाल्या नंतर केलेले सर्वेक्षण. साधारण असे मानले जाते कि मतदानाच्या आधी एकाद्याला विचारले कि "तू कोणाला मत देणार" तर तो खोटे सांगण्याची शक्यता असते, व जरी त्याने खरे सांगितले तरी सर्वेक्षणा नंतर ते मतदाना पर्यंत त्याचा विचार बदलू शकतो. त्याच प्रमाणे सर्वेक्षणाचा मतदानवर परीणाम पण होऊ शकतो. पण हाच प्रश्न मतदान झाल्या नंतर विचारला - "तू कोणाला मत दिले?" - तर तो खरे सांगण्याची शक्यता जास्त असते, व आता सर्व मते मतपेटीत बंद असल्याने आता परीणाम बदलण्याचा प्रश्नच येत नाही.
असे असताना एकाच पक्षाच्या बाजूने वृत्तवाहिन्यांनी दिलेला कौल विचार करायला लावणारा आहे. . . . . ज्याला जनतेचा आधार आहे, तो सत्तेत येईल पण त्या आधीच भाजप सोडल्यास सर्वच
पक्षांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वृत्तवाहिन्यांनी चालवला आहे. मतदान पूर्व असे कौल प्रसिद्ध केल्यास हा आरोप होऊ शकतो. पण मतदान झाल्या नंतरच्या सर्वेक्षणा बाबत तुमची ही टिपण्णी अर्थहीन व हास्यासपद आहे. परीक्षा होण्या आधी जर अमूक एक विद्यार्थी नापास होईल असे भाकीत केले तर त्याचे खच्चीकरण होऊ शकते. पण परीक्षा झाल्या नंतर कोण्या विद्यार्थ्याची तयारी काय होती हे पाहून तो नापास होईल असे भाकीत केले तर त्यात खच्चीकरण कसे काय? तो नापास होणार का पहिला येणार हे आता फिक्स्ड आहे. फक्त ते आपल्या समोर येणे बाकी आहे. सर्वेक्षण करणार्या एजन्सीने कोण्या पक्षाने कडून पैसे घेऊन त्या पक्षाच्या बाजूने व प्रतीस्पर्धी पक्षाच्या विरोधात खोट कौल देणे यात अशक्य काहीच नाही. पण हा उपदव्याप मतदानाच्या आधी करायचा असतो. मतदान झाल्या नंतर त्याने काय साध्य होणार ? मतदारांनी जे काही कुणाचे खच्चीकरण करायचे का उच्चीकरण करायचे ते आधीच केलेले आहे व ते आता मतपेटीत (यंत्रात) बंद आहे व ते बदलणे नाही. आता या स्टेज ला जाणूनबुजून कृत्रिम कौल कोणीही वाहीनी प्रसिद्ध करीत नसते कारण तसे केल्याने परिणाम तर बदलणार नाही, व दोन-चार दिवसांनी जेव्हां मतमोजणी होईल तेव्हां त्यांचे अंदाज साफ चुकल्यास त्यांचे हंसे मात्र होईल.