मी व माझे म्हणजे देहबुद्धी कमी असेल तर अंगीकृत कार्यात न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त होऊ शकते ह्या मुद्द्यावर माझे लेखन आधारित आहे.
मोदी हे शिवाजी महाराज आहेत असे काहीही मला सुचवायचे नाही आहे.
अगदी अशक्य वाटणारे शक्य करून दाखवणे किंवा
सगळ्या बाजूंनी विरोध व प्रतिकूल परिस्थिती असताना त्याचे रूपांतर यशात करणे किंवा
कोणतेही यश सहजासहजी न मिळता प्रत्येक वेळेस आव्हानांना तोंड देऊन व झगडूनच यश मिळवत राहणे.
याच्यातील साम्य दाखविण्यासाठी फक्त शिवरायांचा उल्लेख केला गेला आहे.