"कारण भाजपा आणि शिवसेना यांच्यात एक 'हिंदुत्व'-वाद सोडला तर आणखी काहीच समान नाही. " एकदम बरोबर बोललात.
पण या समान धाग्यामुळे मोदींच्या कॉग्रेसमुक्त भारत या धोरणाला शिवसेनेकडून बळकटी मिळत असेल तर त्याचा विचार मोदींना करण्याशिवाय गत्यंतरच नाही.
मात्र राज्य सरकार योग्य रितीने चालवायचे असेल तर (गुड गव्हर्नन्स) ते शिवसेनेच्या अधिपत्याखाली शक्य नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री भाजपाचा हीच तर मोदींची रणनीती आहे. जर कोणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक काळात दिलेली एक तासाची मुलाखत पाहिली असेल त्याला मुख्यमंत्री काय करू शकतो हे लक्षात येईल. मुख्यमंत्र्याच्या सहिचा महिमा खरेच अगाध आहे असेच म्हणावे लागेल.
राजकारणातच नव्हे तर दैनंदिन जीवनातही एक गोष्ट आपण पाळत असतो. उपद्रवी माणसाशी संबंध येणारच असेल आणि चांगले संबंध प्रस्थापित करता येणे शक्य नसेल तर निदान असा माणूस आपल्या विरोधात जाणार नाही याची काळजी घेणे शहाणपणाचे ठरते.
माझी इच्छा म्हणाल तर
मला वाटते मी माझी अपेक्षा (इच्छा) युती का तुटली भाग १ मध्ये सुरवातीलाच खालील प्रमाणे व्यक्त केली आहे.
"मात्र एक गोष्ट अगोदरच स्पष्ट करू इच्छितो की, मी कोणा एका व्यक्तीचा अथवा पक्षाचा नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी भ्रष्टाचार करू नये. त्याच्याकडे भारताची प्रगती करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी आणि सनदी नोकरांकडून हे काम करून घेण्यासाठी प्रशासनावर घट्ट मांड ठोकून बसण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. मग असा माणूस कोणीही असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो."