"माझ्या मते 'काँगेसमुक्त  भारत' ही फक्त मोदींची एक धूर्त मार्केटिंग स्लोगन आहे. मोदींनी आणि भाजपाने लोकांमधल्या नाराजीचा उपयोग करून घेतला, त्याला खतपाणी घातलं आणि त्यांना स्वप्न दाखवली. हे काम त्यांनी अत्यंत कौशल्याने केले यात शंका नाही.--इसाप"

धूर्त माणूस हा हुशार व चलाख असायलाच लागतो.  तसेच त्याच्याकडे सद्य परिस्थितीचे नीट आकलन करण्याची क्षमता असली पाहिजे. आणि त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला जे आकलन झालेले आहे त्या आधारावर उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणीही करता आली पाहिजे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, धूर्तपणाचा उपयोग करता येणे म्हणजेच अंमलबजावणीतील सुसूत्रात किंवा गुड गवर्नन्स च्या आधारे यश मिळवणे होय. हे सर्व त्यांनी कौशल्याने केले आहे असे तुम्ही म्हणत आहात. त्यामुळे याबाबतीत आपली दोघांची मते सारखीच आहेत असे म्हणावेसे वाटते. यास्तव तुमच्या वरील परिच्छेदातील धूर्त व  "कॉग्रेसमुक्त भारत" या शब्दांबाबत माझे विचार मांडण्याचे प्रयत्न करत आहे.

धूर्तपणा हा चांगला अगर वाईट नसतो. तर धूर्तपणाचा  उपयोग कोणत्या हेतूने केला जातोय यावर तो धूर्तपणा चांगला अथवा वाईट हे ठरत असते. जर माणसामध्ये मी व माझे या दोन घटकांचे प्रमाण जास्त असेल तर असा माणूस त्याचा धूर्तपणा वैयक्तिक स्वार्थीपणासाठी वापरतो. पण तसे नसेल तर ह्याचा उपयोग समाजासाठी अथवा देशासाठी होण्याची शक्यता बळावते. 

त्यासाठी मोदींनी त्यांच्या धूर्तपणाचा उपयोग स्वतःच्या संपत्तीत भर घालण्यासाठी अथवा "माझे" या शब्दात समाविष्ट करता येईल अशा नातेवाइकांच्या भल्यासाठी वापर केलेला आढळून येतो का ते तपासावे लागेल आणि बारा वर्षाच्या त्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीचा अभ्यास करून ते तपासता येईल. मला तरी अजून तसे काही सापडलेले नाही. अर्थात माझा अभ्यास अपुरा पडला असल्याची शक्यता मी नाकारत नाही. व तसे मी युती का तुटली भाग १ च्या प्रस्तावनेत स्पष्टही केलेले आहे.

जर धूर्तपणा पक्षासाठी वापरला जात असेल, म्हणजे पक्ष वाढावा, पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजावीत, देशासाठी  काहीतरी करून दाखवता यावे यासाठी पक्षाला सत्ता मिळावी वगैरेसाठी केला गेल्यास तो वाजवी म्हणावा लागेल. किंबहुना धूर्तपणाच्या आधारावरच राजकारण चालत असते असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.

मात्र परराष्ट्रीय धोरणात जर धूर्तपणा दाखवता आला म्हणजे आपल्या देशाच्या भल्यासाठी इतरांकडून मदत, सहभाग, सहयोग प्राप्त करणे. देशाच्या ध्येय धोरणांच्या यशासाठी लॉबिंग करणे, आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल इतरांच्या मनात आपुलकी निर्माण करणे. किंवा आपल्या देशाबद्दल विश्वास वाटावा अशी परिस्थिती निर्माण करणे वगैरे.  तर मात्र या धूर्तपणाला देशभक्ती म्हणावी लागेल. यासाठी मोदींचे परदेश दौरे या द्दष्टीनेच अभ्यासावे लागतील. मोदींच्या परदेश दौऱ्यांबाबत मला जी काही थोडी फार माहिती मिळाली त्यात अजूनतरी काही संशयास्पद आढळलेले नाही. 

कॉग्रेसमुक्त भारत या शब्दाबद्दल विचार करण्यासाठी आपल्याला गेल्या तीस वर्षातील काँग्रेसी संस्कृती अभ्यासावी लागेल. आपल्या देशाची प्रगती न होण्यामागे आपल्याकडील निवडणुकांचे राजकारण कारणीभूत आहे असे बऱ्याच जणांना वाटते आणि त्यात थोडेफार तथ्यही आहे.

मुस्लिम पतपेढीच्या राजकारणाचा फार मोठा प्रभाव आपल्या निवडणुकांवर होत असतो व कॉग्रेस नेहमीच याचा वापर करत असते. सामान्यत: याचे एकूण तीन टप्पे पडतात. पहिल्या टप्प्यात यासाठी प्रत्येक राज्यातील एखाद्या मोठ्या हिंदू जातीची निवड मुख्य आधार म्हणून केली जाते.  (उदा. महाराष्ट्रात  मराठा किंवा हरियानात जाट वगैरे) दुसऱ्या टप्प्यांत मुस्लिमांमध्ये असुरक्षितता निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर केले जाते व त्यांचे लांगूलचालन करून आम्हीच तुमचे खरे रक्षणकर्ते असा आभास निर्माण केला जातो तर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित समाजात द्वेषाच्या आधारावर जातींजातींमध्ये तर कित्येक वेळेस पोटजातीमध्ये निव्वळ जातीपातींच्या आधारावर छोटे छोटे तुकडे पाडले जातात आणि कोणताही तुकडा मुस्लिम मतपेढी पेक्षा मोठा होणार नाही याची काळजी घेतली जाते. ही विभागणी द्वेषाच्या आधारावर केली गेली असल्याने हे तुकडे कधीही एकत्र येऊन निवडणूक लढवत नाहीत. थोडक्यात अशा रितीने नेहमीच पन्नास टक्के पेक्षा कमी मते मिळवून सत्ता संपादन करता येते. मात्र याचा उपयोग अनेक प्रादेशिक पक्ष करू लागल्याने याबाबतीतील काँग्रेसपक्षाची मक्तेदारी संपुष्टात आलेली आहे.

कॉग्रेस संस्कृतीचा दुसरा अविभाज्य घटक म्हणजे महात्मा गांधीजीच्या नावाचा सतत वापर करणे व काँग्रेसी संस्कृती म्हणजे महात्मा गांधीची विचारसरणी असा आभास सातत्याने निर्माण करणे. आणि त्याच्या मागे मुस्लिम मतपेढीचा आपला खरा चेहरा लपवणे.  उदा. दारू सोडा असे गांधीजींनी सांगितल्यावर दारूत सोडा घालून दारू पिणे. किंवा रोज चरखा चालवायला सांगितल्यावर त्या चरख्याचे चर व खा अशी शब्दफोड करून सतत चरणे व खाणे वगैरे. असो.

मोदींच्या कॉग्रेसमुक्त भारत या घोषणेचा अर्थ वरील दोन परिच्छेदात सांगितलेल्या गोष्टींचे निर्मूलन असा घ्यावासा वाटू लागलाय. पण नुसते वाटून काय उपयोग? काही पुरावा नको का ? पण त्यासाठी मोदींचा गुजराथचा कार्यकाळ अभ्यासावा लागेल. व त्याचे निकष खालील प्रमाणे ठरवावे लागतील.
भाग १
१) मुस्लिम पतपेढीचे राजकारणाचे उच्चाटन गुजराथेत झाले आहे का? माझ्या मते हो. यासाठी मुस्लिम बहुसंख्य मतदार संघाची मतविभागणी तपासावी. तेथून भाजपचे उमेदवार निवडून का येतात ते शोधावे. किती मुस्लिम उमेदवारांना तिकिटे दिली या एका मुद्द्यावर मत बनवणे मला धोक्याचे वाटते.
२) फक्त एका मोठ्या हिंदूसमूहाचा आधार घेऊन त्या आधारे  निवडणुकांचे राजकारण खेळले जाते आहे का? माझ्या मते नाही. 
३)जातीपातींच्या आधारावर द्वेषाद्वारे छोटे छोटे तुकडे पाडले जात आहेत का? नाही.
मुद्दा क्रमांक २ व ३ साठी.
(१९९५ साली केशुभाई पटेलांनी पटेल समूहाचे एकत्रीकरण करून सत्ता संपादन केली होती व तोच प्रयोग २०१२ मध्ये ते करायला गेले पण त्यांना अपयश आले. १०० पेक्षा जास्त उमेदवार उभे करूनही निवडून फक्त दोन का तीन  आले. याउलट जातीपातींचा कोणताही उल्लेख न करता गुजराथी अस्मिता व विकास या मुद्द्यावर जोर देऊन मोदींनी समाजाची एकसंघता टिकवली व यश मिळवले. त्यांच्या यशात पटेल समूहा बरोबर मुस्लिम समाजही सामील झाला असला पाहिजे असा समज मतदानाची टक्केवारी करून देत आहे असे वाटते.
भाग २
१) मी खात नाही व खाऊ देत नाही या धोरणाची अंमलबजावणी करून चरख्याची पुनर्स्थापना केली गेली असे मला वाटते.
२) दारूबंदी केली व दारू सोडा या गांधीजींच्या स्वप्नाची परिपूर्तता केली. दारू पिण्याला जी प्रतिष्ठा आज महाराष्ट्रात आहे तशी ती गुजराथेत नाही. विशेष म्हणजे आज पंधरा ते पंचवीस वर्षे वय असलेल्या पिठीमध्ये दारूचे प्रमाण किती आहे? हे तपासूनच  दारूबंदीची अंमलबजावणीचा परिणाम तपासला गेला पाहिजे. गुजराथेत अजून दारू मिळते असे म्हणून दारूबंदीची टर उडवणे हे सखोल अभ्यासाचे लक्षण म्हणता येणार नाही. तर दारूबंदीच्या काळात मोठे झालेल्या तरुणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

ज्याला काही करून दाखवायचे असते त्याला स्वप्ने पाहावी लागतात. इतरांना ती दाखवावी लागतात. त्यानंतर ही स्वप्ने प्रत्यक्षात येणे शक्य आहे असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागतो. व त्यानंतरच अशी स्वप्ने साकार होऊ लागतात. हे लक्षात घेतले तर मोदी स्वप्ने दाखवतात म्हणजे काहीतरी चुकीचे करत आहेत असे समजणे योग्य ठरणार नाही. उलट ती स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी ते धडपड करताना दिसत आहेत की नाही हे तपासणे योग्य ठरेल. सामान्य माणसाला आपल्यासाठी कोणीतरी धडपड करतो आहे एवढा दिलासाही पुष्कळ असतो. या धडपडीला आज ना उद्या यश येईल या आशेवर तो जगत असतो. त्याच्या हातात चांगले दिवस येतील अशी आशा धरणे व आजचा दिवस ढकलणे इतकेच हातात असते. मात्र कोणीतरी मनापासून व तळमळीने प्रयत्न करतो आहे असे दिसत असेल तर त्याला तो देवदूत भासतो व त्याच्यावर कोणीही कितीही आरोप केले तरी तो अशा माणसाची साथ कधीही सोडत नाही. गुजराथेतील तीन निवडणुका त्याची साक्ष देत आहेत असे मला वाटते.

तेव्हा 'काँग्रेसमुक्त भारत' ही एक फसवी घोषणा आहे. भाजपा-मोदी-संघाने सखोल प्लॅनिंग करून ३ वर्षे पद्धतशीरपणे आणि कौशल्याने स्ट्रॅटेजी राबवली याचे श्रेय मात्र त्यांना द्यावेच लागेल -- इसाप

सखोल प्लॅनिंग,३ वर्षे पद्धतशीर प्रयत्न आणि कौशल्य या शब्दांचा तुम्ही उल्लेख करत आहात म्हणजे जणू गुड गव्हर्नन्स या शब्दाची व्याख्याच सांगत आहात. त्यामुळे तुम्ही मोदींवर टीका करत आहात की भलावण तेच समजत नाही आहे.

सखोल प्लॅनिंग म्हणजे कोणते स्वप्न प्रत्यक्षात येणे शक्य आहे त्याचा विचार करून मग त्याचा कालबद्ध आराखडा बनवणे.
३ वर्षे पद्धतशीर प्रयत्न म्हणजे प्रयत्नात सातत्य असणे व काम करण्याचा कंटाळा नसणे.
कौशल्य या शब्दात तर बाकी जे काही राहिले ते सगळेच आले.
याची फलश्रुती म्हणजे यश

हे सगळे मोदी - भाजपा व संघाकडे असेल व त्यामुळे यश प्राप्त होणे शक्य असेल तरीही मोदी खरे स्वप्न दाखविण्याऐवजी खोटेच स्वप्न दाखवणार हे समजणे जरा अवघडच जातेय. असो.

हे उत्तर मूळ लेखापेक्षाही मोठे झालेय. वाजपेयी व मोदी यात खूप फरक आहे. पण त्याबाबत लिहिण्याचे टाळतोय. अन्यथा सर्वसमावेशक या शब्दाबद्दल लिहण्यासारखे बरेच आहे.