चर्चेला योग्य वेळी आणि योग्य प्रकारे पूर्णविराम (किंवा अर्धविराम) देण्याचे सौजन्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.  माझी मते तुम्हाला पटतील / पटावीत अशी अपेक्षा मला अर्थात नव्हती. मी फक्त माझी मते मांडण्याची ही संधी घेतली एवढच. या निमित्ताने ही मते किंवा आपण म्हणता त्याप्रमाणे विरुद्ध'दृष्टीकोन "विरोधकांपर्यंत" आणि इतरांपर्यंतही पोचावा हा उद्देश होता. 

मोदी समर्थक आणि विरोधक यांनी मोदी समजावून घेण्याची वेळ आली आहे असे आपण म्हणता. मोदी समजावून घेणे अवघड आहे असेही आपण आधी म्हटले होते. याविषयी फक्त एक शेवटची टिप्पणी - मोदी समजणे अवघड आहे असे मला अजिबात वाटत नाही. उलट मोदी समजायला अतिशय सोपे आहेत. फक्त दोन तीन सुत्र लक्षात घेतली की मोदींची पूर्ण संगती लागते. पण मी आता त्यात जाऊ इच्छित नाही, नाही तर नवीन एखाद्या वादाला तोंड फुटू शकेल.  

पुढे काय होईल हे काळाच्या ओघात दिसेलच. एकच गोष्ट लक्षाठेवण्यासारखी आहे, की कोणत्याही लाटेचं आयुष्य हे क्षणिकच असतं. हा भौतिकशास्त्राचा आणि जीवनाचादेखील निय आहे. लाट ओसरू लागल्यावर मोदींच पुढच पाऊल काय असेल, हा एका दृष्टीने कुतुहलाचा आणि कदाचित काळजीचा विषय आहे.  

चर्चिण्यासारखे अजून पुष्कळच मुद्दे आहेत, पण सर्व लिहिणे कष्टाचे (आणि वादाचे देखील) आहे आणि त्यातून काही साध्यही होण्यासारखे नाही. तेव्हा आता, विश्राम  !!