आपल्या कडे अशी पद्धत आहे कि कुठून तरी सर्व दोष राजकारण्यांच्या माथ्या वर थापून मोकळे व्हायचे. जनतेचा कधीच दोष नसतो. राजकारणी साक्षात धर्मराजाचे अवतार आहेत असे अजिबात नाही. पण जनता सुद्धा तेवढीच दोषी आहे.
राजकारण्यांना आपण नांवे ठेवतो कि ते मतदारांना पैसे देवून अमिषे दाखवून मते घेतात. पण मतदार पैसे घेवून मते का देतात? कायद्या प्रमाणे लाच देणारा व लाच घेणारा, दोघे ही दोषी असतात. तरी पण साधारणतः सर्व दोष पैसे घेणार्या वरच ठेवला जातो. जसे - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल पोलिसाने अडविले तर चालान पासून वाचण्या करता पोलिसाला लाच दिल्यास पैसे घेणारा पोलिस भ्रष्ट. आधी वाहतूक नियम तोडणारी, व मग कायद्या प्रमाणे दंड न भरता पोलिसाला लाच देणारी जनता कधीच दोषी नसते.
मतदान प्रकरणी पैसे घेणारी जनता असते. पण इथे मात्र सगळी चूक पैसे देणार्या राजकारण्याचीच. तुम्ही दिलेत तर आम्ही घेणार, व त्याचे खापर तुमच्याच डोक्या वर फोडणार. तसेच, जात धर्म इत्यादी पाहून उमेदवार उभा करणारा राजकीय पक्ष दोषी. पण जात धर्म इत्यादी पाहून मतदान करणारा कधीच दोषी नाही. गुन्हा नोंदविला असलेल्या उमेदवाराला उभा करणारा राजकीय पक्ष दोषी. पण गुन्हा नोंदविला असलेल्या उमेदवाराला मतदान करणारा कधीच दोषी नाही. वगैरे. जो पर्यंत जनता हे मान्य करत नाही कि काही अंशी तरी जनता पण लांडगा आहे, तो पर्यंत हे असेच चालणार.