शर्ट प्यांट भारतीय पोषाख आहे काय ? तसेच पायात बूट; डायनिंग टेबल-खुर्ची; जेवताना चमचे, क्वचित तर काटा-सुरी पण; शंभर वाद्यांचा ओर्केस्ट्रा असलेले संगीत; आईस्क्रीम; ब्रेड; स्टक्चर्ड शिक्षण - म्हणजे एक प्रमाणित अभ्यासक्रम एका ठरविलेल्या काळात शिकणे व परीक्षेत उत्तीर्ण होऊन डिग्री मिळविणे; हे सर्व भारतीय आहे काय?
तसेच ज्या लोकांना इंग्रजी ही भारतीय भाषा झाली आहे काय असा वारंवार प्रश्न पडतो, ते धोतर-बंडी असा पोषाख करतात का? पायात वाहणा, पाटवर बसून जेवणे; हातानेच घास घेणे; ध्रुपद, फार फार तर खयाल संगीतच ऐकणे; गुरू घरी राहून गुरू ज्या गतीने व जेवढे शिकवेल तेवढेच शिकणे; वगैरे करतात का ?