बरोबर. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

मात्र ती सप्तमी नसून एकवचनी तृतीया असावी (येरझारेने, येरझारेमुळे अशा अर्थी) असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

शिवाय

(सुरेश भटांची?) "चालुदे वक्षात माझ्या वादळांचे येरझारे" अशी काहीशी ओळ वाचलेली आठवते.
पुल्लिंगी अनेकवचनाचा प्रयोग जालावर इतर अनेक ठिकाणी झालेला दिसतो.

मुद्दा हा आहे की 'येरझारे' असे म्हणणे येथे चालून जावे, असे वाटते.