मत्प्रिय मनोगती, चेतन,
पोषाखाचा प्रश्न नाहिए! प्रश्न भाषेचा आहे.
आणि असंही तुम्ही वरती नमूद केलेल्या गोष्टी आपण भारतीय करतो हे मान्य. पण त्यामुळं आपण भारतीय नाही, हे कसं काय?
म्हणजे उद्या समजा, एखाद्या इंग्रजानं किंवा अमेरिकन व्यक्तीनं संस्कृत पुस्तकं वाचायला सुरुवात केली, योगासनं वगैरे करायला सुरुवात केली, हिंदी किंवा तत्सम एखादी भारतीय भाषा बोलू लागला तर त्याला आपण मग "भारतीय" म्हणायचं का? नाही ना? ती अमेरिकन किंवा इंग्रजच राहणार. तसंच आहे हेही.
हां, हे मान्य की आपली जीवनशैली इंग्रजाळलीय, पण म्हणून आपला "भारतीयपणा" कुठेही गेलेला नाहीए. आपण आपलेच सण-उत्सव साजरे करतो, आणि आपल्याच पद्धतीने. (आता इथे हेही मान्य की, हे साजरे करताना लागणाऱ्या वस्तू कदाचित विदेशी असू शकतात, रोषणाईचे दिवे, आकाशकंदील, पणत्या, कपडे किंवा इतर सजावटीच्या वस्तू, फटाके, मूर्ती, वगैरे... म्हणून हे मान्य की आपली जीवनशैली इंग्रजाळलीय.)
बरं हे सगळं झालं विषयांतर....... मूळ विषय आहे, इंग्रजी ही भाषा भारतीय भाषा झालीय का? माझं मत असं आहे की, त्या भाषेला भारतीयत्वाचं एक वेष्टन चढलंय. परंतू, त्या वेष्टनाच्या आत मात्र इंग्रजीला स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. त्यामुळं ती पूर्णपणे भारतीय नाही झालेली आणि तसं होणं शक्यही नाही. सगळं मान्य की, तिचा वापर नसलेलं एकही क्षेत्र नाही, अगदी तळागाळातले, सर्वथरातले लोक ती थोडीफार प्रमाणात का होईना, तिचा वापर करतात, पण तरीही ती अजून "वेष्टननशींच" आहे.
..................कृष्णकुमार द. जोशी