तुम्ही वरती नमूद केलेल्या गोष्टी आपण भारतीय करतो हे मान्य. पण त्यामुळं आपण भारतीय नाही, हे कसं काय?

? ? ? मी कधी म्हंटल कि आपण शर्ट प्यांट घालतो, किंवा ब्रेड खातो, म्हणून आपण भारतीय नाही ?  उलट तर्क असा होता कि जसे शर्ट प्यांट हा पोषाख, किंवा ब्रेड हा न्याहरीचा पदार्थ, भारतीय  झाला आहे का असा प्रश्न आपल्याला पडत नाही; यात आपल्याला भारतीय संस्कृतीचा र्हास किंवा इंग्रजांची गुलामगिरी दिसत नाही; व सर्व नाही तरी खूप भारतीय लोक शर्ट प्यांट घालतात, ब्रेड खातात, कारण त्यात काही सोयी आहेत, व म्हणून आपण आता त्याच्या कडे परकी वस्तू म्हणून पाहात नाही; अगदी तसेच इंग्रजी ही भाषा भारतीय  झाली आहे का असा प्रश्न पण आपल्याला पडू नये; इंग्रजी बोलण्यात भारतीय संस्कृतीचा र्हास किंवा इंग्रजांची गुलामगिरी पाहू नये; व इंग्रजी ही भाषा सर्व नाही तरी खूप भारतीय लोक वापरतात कारण त्यात पण काही सोयी आहेत, व म्हणून आपण आता त्याच्या कडे परकी भाषा असे पाहू नये. इंग्रजी आता "भारताळली" आहे.

हे सर्व इतक्या विस्तृत करून सांगण्याचे कारण असे कि आत्ता इथे या धाग्यात नाही, पण अनेक संकेत स्थळांवर व अनेक नियतकालिकांमध्ये वारंवार असा आग्रह धरणारे लेख येत असतात कि सर्व शिक्षण - अगदी उच्च शिक्षण सुद्धा - मराठीतूनच असले पाहिजे. व त्या करता कोणतेही तार्किक कारण न सापडल्या मुळे इंग्रजीला किंवा इंग्रजीतून शिक्षणाला "आमच्या हाता पायातील बेड्या, इंग्रजांची गुलामगिरी, इंग्रजांचे मांडलिकत्व" इत्यादी थेट भावनेला हात घालणाऱ्या संज्ञा देण्यात येतात. एकदा चर्चा भावनिक पातळी वर गेली कि मग तर्काला स्थानच उरत नाही. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे हे एक वेळ मान्य करता येईल. पण थर्मोडायनामिक्स किंवा गॅस्ट्रोएण्टेरोलॉजी पण मातृभाषेतून शिकावी असा आग्रह धरणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. महाराष्ट्रातून सर्व परप्रांतीयांना हाकून काढण्याची भाषा करणार्यांना मतदारांनी फक्त एक जागा दिली. तेव्हा आता तरी "विचारवंतांनी" मराठी अस्मितेला जरा वास्तवाच्या चौकटीत बसवावे.