ओके, तुमचा मुद्दा लक्षात आला.
ते असो, पण, मूळ प्रश्नातून "इंग्रजांची गुलामगिरी, भारतीय संस्कृतीचा ऱ्हास" असा काही वास येत नव्हता, मग ह्या मुद्द्यांचा उल्लेख उगीच कशाला केलात, नसता केलात तरीही चाललं असतं, नाही का? बर, ते जाऊ दे.
थर्मोडायनामिक्स किंवा गॅस्ट्रोएण्टेरोलॉजी पण मातृभाषेतून शिकावी असा आग्रह धरणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
वरील विषय जर जर्मन, फ्रेंच, चायनीज, जपानी, रशियन, स्पॅनिश, इटालियन वगैरे "इंग्रजेतर" भाषेत शिकता आणि शिकविता येऊ शकत असतील तर मग भारतीय किंवा अगदी मराठीत का शिकविता अगर शिकविता (अगर दोन्ही) येऊ नयेत. किंवा किमान तसा प्रयत्न तरी का होऊ नये. सुरुवातीलाच हे काम "मूर्खपणाच्या" श्रेणीत का नेऊन टाकावं? कठीण आहे पण अशक्य नाही. पण आपण तसा प्रयत्न आजवर केलेला नाही. इंग्रजीत आहे ना उपलब्ध, इंग्रजी येतंय ना वाचायला मग इतर भाषेत कशाला उगीच करत बसा. असाच विचार केला जातोय कि नाही?
पण ह्या सर्वासाठी तयारी प्रचंड लागणार. शब्दकोश वगैरे आणि इतर बरंच काही, पैसाही. पण हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? ह्याच्यावर विचार होताना दिसत नाही. हे केल्यानं समाजाचा फायदा किती होईल ह्याचं गणित कुणी मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे किंवा ह्या विषयांवरील ज्ञान/शिक्षण मराठीत उपलब्ध झाल्यास नक्कीच आता जितक्यांना फायदा होतोय त्यापेक्षा जास्त लोकांना फायदा होईल. हे प्रमाण नेमकं किती जास्त असेल हे नाही सांगता यायचं.
.... मला कदाचित हे सगळं नीट मांडता आलेलं नसेल/नाहीये पण भावना पोहोचल्या असाव्यात.....