इंग्रजी ही भारतीय भाषाच आहे, त्यावर उगीच चर्वितचर्वण करून काहीही निष्पन्‍न होणार नाही.   जर भारतीयांना जगाच्या बरोबर राहावयाचे असेल तर इंग्रजी भाषा उत्तम येण्याशिवाय पर्याय नाही. इतकेच नाही तर, भारतात आपल्याला बिनधास्तपणे फिरायचे असेल, तरीही इंग्रजीत बोलता येणे, किंवा निदान इंग्रजी समजणे अनिवार्य आहे.  भारताची आजची एकता एके काळी संस्कृतमुळे होती, आता ती केवळ इंग्रजीमुळे आहे.  महाराष्ट्रात मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या माणसाला महाराष्ट्राबाहेर कुत्रेही विचारत नाही.  त्याला आपल्याच विहिरीत डुबुकडुबुक करावे लागते.

आणि विशेष म्हणजे, जगातील कुठल्याही देशात,  प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, मग ते भारतात का मिळावे?  ( या विषयावर फार फार पूर्वी मनोगतावरच चर्चा झाली होती.  आणि हे मत मान्य झाले होते. मनोगताच्या विदाला अपघात झाल्यानंतर ती चर्चा बहुधा नष्ट झाली असावी. )