मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

ह्या द्विपदी आवडल्या. "कितीतर" जरा खटकले. (असा शब्दप्रयोग असल्यास आक्षेप मागे घेतो. मात्र नसल्यास सरळ हृस्व-दीर्घात व्याकरणमान्य सूट घेऊन 'कितितरी' का वापरू नये?)
काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही
ही ओळ लयीत म्हणायला जड जात आहे.