अर्थ ईतका सुंदर आहे कि यमक, शब्द, वृत्त या सगळ्या पलिकड जाऊन कवितेची/अर्थाची अनुभूती येत आहे

तरीही .. श्री मिलिंदजींनी सांगितलेली लय, गेयता पाहून मला राहवलं नाही म्हणून आणखी काही ....नेव्हर माइंड...

सुखाचा हा माल माझा विकला का जातच नाही
बाजारी ह्या काय आज कोणी दुःखातच नाही

पालटण्याचे नशिबाला केले यत्न केवढे पण
होणार कसे त्याच्या जर का हे नशिबातच नाही

जन्म घेउनिया इथे मी झालीत वर्षे कितीतरी  
साजरे हे दुःख करणे माझ्या का लक्षातच नाही

का नको त्या तिथे घालितो टाके हा शिंपी 
आंधळा आहे जणु हा काहीही पाहातच नाही

गावातील शाळेतही आहेत केवऴ मुलीं मुली
पाहुन हे मुलगा माझा शाळेला जातच नाही

नेणिवबिंदूंतुनी त्रिज्या म्हटले काही खेचूया 
अमोघ ह्या परी परिघाला बहुधा संपातच नाही
 
----शेवटच्या ओळीत "परी" हा शब्द असा मध्ये वापरून  तुम्ही हे वाचकांवर सोडून देऊ शकता कि "अमोघ ह्या परी" हे  "परीघासाठी" आहे का त्रीज्ये साठी. ज्यायोगे कवितेची खोली आणखी वाढू शकते  (आपल्याला हे माहित आहे कि तो परीघासाठी आहे)