एक विद्यार्थीनी बारावी उत्तीर्ण होवून मेडिकल प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहे. एमबीबीएस व मग एमडी करावे असा तिचा मानस आहे. महाराष्ट्र सरकारने तिला हे शिक्षण मराठीतून घेण्याची सोय करून दिली आहे. आता तिला हा निर्णय घ्यायचा आहे कि एमबीबीएस करता प्रवेश इंग्रजी माध्यमातून घ्यायचा का मराठी माध्यमातून. आज एमबीबीएस करता प्रवेश घेताना आजपासून पाच वर्षं नंतर एमडी करता महाराष्ट्रातल्याच एकाद्या विद्यालयात प्रवेश मिळेल याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. त्याच प्रमाणे नंतर नोकरी महाराष्ट्रातीलच रुग्णालयात मिळेल याची खात्री पण आज कोणीही देऊ शकत नाही. आता तिच्या समोर दोन पर्याय आहेत.
१: मराठी माध्यमातून एमबीबीएस करता प्रवेश घ्यायचा. पाच वर्षे नंतर एमडी करता पण मराठीत प्रवेश मिळाला तर फारच छान. नाही मिळाला तर, एमबीबीएस वरच समाधान मानायचे. आणी वैद्यकीय करीयर पण अर्थातच फक्त महाराष्ट्रातच. कारण मराठीत एमबीबीएस केलेल्या डॉक्टरला तामिळनाडू किंवा बंगाल येथील रुग्णालये का म्हणून पत्करतील ? (सर्व शिक्षण तमिळ भाषेत घेतलेल्या डॉक्टरला आपण महाराष्ट्रात खपवून घेवू?). अन्यथा महाराष्ट्रा बाहेर एमडी व करीयर करण्या करता आधी इंग्रजी भाषा शिकायची, मग आपले सर्व वैद्यकीय ज्ञान इंग्रजीत अप-ग्रेड करायचे.
२: आधीच इंग्रजी माध्यमातून एमबीबीएस करता प्रवेश घेवून भविष्यात पुढचे शिक्षण तसेच नोकरी करता सर्व दारे उघडी ठेवायची.
या विद्यार्थिनीने पर्याय १: का निवडावा ?