आता ही व्यक्ती एक तर २५ माळ्यांच्या किंवा मजल्यांच्या इमारतीत राहत आहे. अशी इमारत (Building / Tower) ही शहरात असते. बरं, कमीत कमी २ ते ३ खोल्यांचं तरी घर असणार या व्यक्तिचं. म्हणजेच दोन वेळच्या जेवणाचीदेखील सोय होत असणार. तरीदेखील अशा व्यक्ती स्वतःच्या त्रासाचं एवढं भांडवल जेव्हा करतात तेव्हा खरंच हसू येतं. जगात आजही दोन वेळचं जेवण न मिळणार्या व्यक्ती असंख्य आहेत. जगात आजही ज्यांच्या डोक्यावर छत नाही अशा असंख्य व्यक्ती आहेत. जगात आजही असंख्य व्यक्ती आहेत ज्यांना अंग झाकायला कापड नाही आणि अशा मोठमोठ्या इमारतीत राहणार्या व्यक्तिंना या सगळ्याचं भान नसणं ही खरी तर लाजिरवाणी गोष्ट आहे.

दोन वेळचं जेवण न मिळणे, डोक्यावर छत नसणे, अंग झाकायला कापड नसणे, हे सर्व अत्यंत दुर्दैवी आहे. पण असे लोक आहेत म्हणून काय इतर कोणी काही त्रास व्यक्तच करू नये?  आणी त्रासाचे "भांडवल" करणे म्हणजे काय? त्या व्यक्तीने काय जिना चढायला फायर-ब्रिगेडची मदत मागितली? त्रास झाला म्हणून सरकारी अनुदान मागितले? लिफ्ट दुरुस्त होई पर्यंत सरकारी खर्चाने हॉटेलात राहायची सोय मागितली? "मला त्रास होत आहे" येवढेच म्हंटले ना? मग त्यात "भांडवल" करणे म्हणजे काय?

जगात प्रत्येक व्यक्तीला दोन वेळचं जेवण, डोक्यावर छत व अंग झाकायला कापड, हे कदाचित कधीच शक्य होणार नाही. म्हणून इतर कोणाला काहीही त्रास झाला तर तो त्याने मुकाट्याने सहन करायचा? उगाच आपले कै-च्या-कै.

(संपादित)