आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे "होय" अशी आहेत.
१: माझ्या संगणकात सी-डाक यांच्या वेब साईट वरून घेतलेले लिब्रे ऑफिस (३.६.०.१) आधीच आहे. त्याचा काही उपयोग होईल का?
लिब्रर ऑफिससाठी आपण खाली दिलेले स्पेल चेक एक्श्टिंशन टाकू शकता.
दुवा क्र. १
२: तुमच्या सॉफ्ट् वेयर ने टाईप केलेली अक्षरे यूनीकोड असतात का?
अर्थात
३: टायपिंग फोनेटिक आहे का?
चार प्रकार आहेत. फोनेटिक, आयट्रान्स, इन्स्क्रिप्ट आणि एक नवीन गमप नावाचा कीबोर्ड. चित्रात अगदी वर हे प्रकार आपण पाहू शकता.
४: तुमच्या सॉफ्ट् वेयर ने टाईप करून सेव केलेली फाईल विंडोज व एम एस वर्ड मध्ये उघडता येईल का?
होय.
५: किंवा त्याहीपेक्षा आधी, ती विंडोज च्या फोल्डर मध्ये सेव होईल, का उबंटू करता एक वेगळे पार्टीशन करून त्याच फाईल सिस्टीम मध्ये सेव करावी लागेल? ?
लाईव्ह सीडीवरून केलेले काम आपण आपल्या हार्डडिस्कवर सेव्ह करू शकता, सी अथवा डी ड्राईव्हवर. त्यानंतर सीडी काढून परत संगणक सुरू केला (विंडोजमध्ये) की त्यातील वर्डमधून हीच फाईल ओपन करू शकता.