१ - चतुर राजकारणी कोणत्याही घटनेतून स्वतःला लाभ कसा करून घेता येईल ते बघत असतात. महात्मा गांधींची हत्या ज्या मानसिकतेतून झाली, त्याच मानसिकतेतून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झालेली आहे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान याचा एक उत्तम नमुना आहे. दाभोलकर यांची हत्या तर झाली. ती कोणी केली हे कालांतराने (कदाचित) तपास लागेलच. तो पर्यंत त्या हत्येचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांवर करून त्याचा काही राजकीय लाभ पदरात पाडून घ्यायला काय हरकत आहे? त्यांची शब्द योजना अत्यंत चतुर होती. प्रत्यक्षात कोणत्याही संघटनेचा उल्लेख न करता "मानसिकतेतून" या शबदातून त्यांना कोणत्या संघटना सूचित करायच्या आहेत हे त्यांनी स्पष्ट उघड केले. (पण त्याचा काहीही राजकीय लाभ मिळाला नाही)

२- सगळ्यांनाच पोलीस संरक्षण देणे व्यवहार्य नाही. तरी पण समाजात खून, दरोडे, बलात्कार इत्यादी घटना होऊ नयेत  असा कायदा व्यवस्थेचा वचक असला पाहिजे. या घटना जेहां दिवसा ढवळी होतात, तेंव्हा पोलिसांचा वचक राहिला नाही हे सिद्ध होते.

३-  दाभोलकरांचे मारेकरी सापडणे कठीण आहे हे विधान श्याम मानव यांनी काय विचाराने केले ते माहीत नाही. (मारेकर्यांनी काही क्ल्यूस मागे सोडले नाहीत, खून या पातळी पार्यंत पोहोचायला काही स्ट्राँग मोटिव्ह दिसत नाही, इत्यादी). पण असल्या टिप्पणीने पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ लागला, तर कठीण आहे. पोलिसांचे मनोधैर्य इतके लेचेपेचे असावे ?