>>३. हल्लीचा ख, हा 'व'ला दुगाणी झाडणार्‍या  र सारखा दिसतो.  त्याच्याऐवजी 'उभट र'शेजारी 'व' असेलेला ख
हा मुद्दा मला समजला नाही. मला जो ख दिसतो आहे तो समाधानकारक आहे .

स्पष्टीकरण : हल्ली आपण जो ख लिहितो तो आधी हिंदीने बनविलेला आणि काही वर्षांनी महाराष्ट्र सरकारने
बरीच खळखळ करून स्वीकारलेला ख आहे.  हिंदी लिपीत अक्षरे हात न उचलता लिहिण्याची पद्धत आहे.
हिंदी लिहिताना आधी शिरोरेषा काढतात आणि मग तिच्या खाली  अक्षर काढतात, मराठीत त्याच्या उलट. त्यामुळे हिंदी अक्षरे
मराठी अक्षरांपेक्षा वेगळी दिसतात.

उदा० हिंदी र लिहिताना आधी शिरोरेषा, मग हात न उचलता एक उभी रेघ, आणि मग त्या उभ्या रेघेच्या डावीकडून
किंचित वर गेल्यावर आतून गाठ मारून एक तिरपी रेघ काढली की झाला र.   मराठी र काढताना आधी  'ग'चा कंस  काढतात,
मग त्या ग च्या गाठीतून एक तिरपी रेघ काढतात.  शेवटी शिरोरेषा.  थोडक्यात काय तर हिंदी र आतल्या गाठीचा असतो,
तर मराठी र ची गाठ बाहेरून असते.

अशाच प्रकारे हिंदी ख काढताना आधी शिरोरेषा, तिला जोडून हिंदी र आणि त्याच र चे शेवटचे टोक उजव्या बाजूने
मध्ये एक गाठ मारून परत शिरोरेषेपर्यंत ओढायचे.   म्हणजे हात न उचलता ख लिहिता येतो.  ह्या ख चे वर्णन,  'र'ने  'व'ला
मागच्या पायाने दुगाणी झाडली आहे असे करता येते.  मराठी आणि संस्कृत ख हा 'रव' असा, म्हणजे र आणि व शेजारी शेजारी
लिहिल्याप्रमाणे  दिसतो.  यांतला 'र' हा नेहमीच्या 'र'पेक्षा अरुंद असतो आणि त्याच्या अगदी जवळ  'व' असतो.  हे अक्षर ख  आहे हे सहज ओळखता येते.  त्यामुळे वानरवेडे आणि वानखेडे  हे शब्द वाचताना घोटाळा होत नाही.

>>> ४. ..दीर्घ ऌ
(उजवीकडील अल्ट् की) alt key + shift + L + alt key +  l   (कगप फोनेटिक कीबोर्ड)

बापरे! दीर्घ ॡ काढताना वरीच खटपट करावी लागते आहे. नशीब, मराठीत या दीर्घ ॡ चा एकही शब्द नाही.

>>> ८. . त्र ला ला वाटी जोडून काढलेला जुन्या पद्धतीचा उभ्या बांधणीचा मराठी क्र टाईप करता येईल? तो स्पष्टपणे वाचता येतो,  हल्लीचा क्र आहे की क्न ते समजत नाही.

>>> ९.  पक्का (जोडाक्षराची उभी मांडणी) -  p + k + f + k + a

स्पष्टीकरण : जोडाक्षराची उभी जोडणी म्हणजे एकाखाली एक व्यंजने लिहिणे. क्क लिहिताना एकाच उभ्या रेषेला 'क'च्या दोन्ही वाट्या जोडल्या की उभ्या जोडणीचा क्क होतो.  आडवी जोडणी म्हणे स्वरदंड नसलेला क्‍  काढून त्याला एक पूर्ण क जोडणे.  आडव्या जोडणीची जोडाक्षरे रुंद असल्याने जास्त जागा व्यापतात.
 क्त हा आडव्या जोडणीचा तर त्त काढून त्याला 'क'ची वाटी जोडली की उभ्या जोडणीचा क्त होतो.  

तसेच क्र (क्‍र) बद्दल. 'क' लिहिताना जर त्याचा स्वरदंड आखुड असेल तर क'ची डावीकडची वाटी जमिनीला
टेकण्याची भीती असते. असे झाले की त्याला तिरप्या रेषेचा 'र' जोडणे अवघड होते, आणि ते जोडाक्षर क्‍न आहे की क्‍र हे नीटसे समजत
नाही.  त्यासाठी आपल्या पूर्वजांनी एका खास क्‍र ची रचना केली. 'त्र' काढून त्याला 'क'ची वाटी जोडून हा खास क्‍र बनतो.

दुवा क्र. १  या 'दुव्यावर

मराठी पहिले पुस्तक 

नावाच्या पुस्तकाच्या १८व्या पानावर आपल्याला हा क्‍र पाहता येईल.

'क'ला तिरप्या रेघेचा र जोडणे जसे अवघड जाते तसेच 'त'ला आणि 'श'ला.  त्यासाठी त्‍र हे अक्षर त्र असे, 
आणि श्‍र हे अक्षर श्र असे काढण्याची आपल्या पूर्वजांनी पद्धत पाडली.  संगणकावर जर श्र, श्व, श्न, श्ल, श्च  ही अक्षरे अशीच 'श्री'तला श काढून लिहिता आली नाहीत, तर आपण आपली परंपरा जपली नाही असे होईल.....

विशेष :
क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे असली तरी त्यांचा लिखाणात भरपूर वापर आहे.  म्हणूनच ती अक्षरे क्‍ष आणि ज्‍ञ अशी लिहून लिखाण बोजड होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.