>>आपण १८७० सालातील पुस्तकाचा हवाला देऊन ती परंपरा आपण जपली पाहिजे असा आग्रह धरला आहे.<<
दुसरा मार्ग नव्हता. २००० सालातील पुस्तकाचा संदर्भ देता आला असता, पण ती पुस्तके प्रताधिकारमुक्त नसल्याने आंतरजालावर सापडणार नाहीत. हे १८७० सालचे पुस्तक शोधायलाही काही कमी तकलीफ झाली नाही.
मुद्दा किती सालचे पुस्तक हा नाही, तर तिरप्या रेघेचा 'र' सहजासहजी जोडता येत नाही म्हणून ट. ठ. ड, ढ, छ, त, श, या व्यंजनांना केली तशीच 'क' साठी केलेली जराशी वेगळ्या प्रकारची खास व्यवस्था आपण मोडीत काढायची का, हा आहे.