आपल्या दिनचर्येतील कार्यक्रमांमध्ये धर्माला बाजूला ठेवणं हे अजूनपर्यंत कोणालाच जमले नाही, म्हणून हे सगळे प्रकार होतात. जो उठतो तो  हिंदू धर्माला नावे ठेवतो आणि सुधारणेची अपेक्षाही त्याच धर्माकडून करतो. जसे तुम्ही जैन धर्माबाबत दाखवून दिले आहे तसे दाखवण्याची सक्ती हिंदुधर्मावर करण्याची आवश्य्कता नाही. धर्म हा वैयक्तिक पातळीवर ठेवण्याचे आवाहन कोणीही करताना दिसत नाही. त्यात असे करणाऱ्यांचे  हितसंबंध असू शकतात. पण सुधारणा हवी ती आमच्या श्रद्धांचे संगोपन सुरळीत होत असेल तरच ., असा एकूसगळ्यांचाच कल दिसतो. त्यामानाने तुम्ही छेडलेला मुद्दा नक्कीच चांगला आहे. एकूण आम्हाला बदल नकोच आहेत. आमचे सगळे सोपस्कार नीट व्हावेत हीच गर्भित अपेक्षा असते. तरीही आम्ही  बदल करण्यास तयार आहोत हा देखावा फक्त आम्हाला  हवा आहे. मग अशा परिस्थितीत स्वतःच्या चुका पाहून काय साधणार ?