शिरीष फडके,

तुमच्या पुढच्या लेखनाबद्दल सूचना :

पुढले लेखन (आजी-आजोबा) पूर्ण करून 'प्रकाशनास योग्य' असे म्हणून तुम्ही सुपूर्त केलेले दिसत आहे. त्या लेखनातल्या शुद्धलेखनाच्या चुका शुद्धिचिकित्सकाचा वापर करून किंवा इतर प्रकारे शोधून त्या काळजीपूर्वक सुधाराव्या ही विनंती.

तसा प्रयत्न तुम्ही केलेला आहे असे प्रशासनाचे समाधान झाले तर/की त्याच्या प्रकाशनाचा विचार प्रशासनाला करता येईल, असे वाटते.

मराठी आंतरजालावर प्रकाशित होणारे लेखन जास्तीत जास्त बिनचूक असावे ह्या उद्देशाने प्रशासन आणि सदस्य परस्परांना करीत असलेल्या सहकार्याची जाणीव सर्वांना व्हावी ह्या दृष्टीने हे निवेदन द्यावेसे वाटते.

कळावे.