खरे सांगा आपल्या पैकी किती जण मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर दुध वाहतात ?

अनिंस ने केली तीच चूक तुम्ही पण करीत आहात, अंधश्रद्धा आणि धर्माची कर्मकांडे (रिचुअल्स) यात गल्लत.  शंकराच्या पिंडीवर दुध वाहणे हे धार्मिक कर्मकांड आहे. प्रत्येकच धर्मात अशी कर्मकांडे असतातच. अंद्धश्रद्धा या शब्दाची अचूक व्याख्या करणे कठीण आहे. जे सिद्ध करता येत नाही त्या वर विश्वास ठेवणे म्हणेज अंधश्रद्धा, व त्या अर्थाने कोणत्याही देवा वर विश्वास व त्याची भक्ती/ पूजा करणे म्हणजे अंधश्रद्धा. तरी सुद्धा "अंधश्रद्धा" या शब्दात धर्माची कर्मकांडे असा अर्थ अपेक्षित नसतो.

अंधश्रद्धा म्हणजे घराची रचना वास्तू शास्त्रा प्रमाणे करणे; झोपताना दक्षिण दिशे कडे पाय न करणे; लग्न ठरविताना पत्रिका पाहणे; कोणतेही काम सुरु करताना मुहूर्त पाहणे; व काही (तथाकथित) अशुभ मुहूर्त टाळणे; प्रवासाला निघताना अमावस्या व इतर काही वेळा टाळणे; वगैरे.  या प्रकारच्या (अंध)श्रद्धा बहुतेक करून हिंदू धर्मातच आहेत.