चेतनजी,
अहो बहुतेक माझा मुद्दा लक्शत आला नाही. मी म्हणालो "जो पर्यंत एखादी कृती, श्रद्धा अथवा प्रथा हि वक्ती अथवा एखाद्या समूहाच्या स्वातंत्राच्या आणि सन्मानाच्या विरुद्ध नाही (harmless ) तो  पर्यंत ती केवळ विज्ञानाच्या / सुधारणेच्या चष्म्यातून पाहून (आणि त्याला विज्ञानात उत्तर नाही म्हणून किंवा आपल्याला मिळाले नाही म्हणून) त्यावर टीका करू नये असे माझे मत आहे".
आता, तुम्ही सांगा वर सांगितलेल्या वरिल सर्व कृति/श्रद्धे मध्ये काय नुकसान आहे? ते एखाद्या  घरचे/समुहाचे/धर्माचे नियम आहेत श्रद्धा आहे म्हणा हवे तर. आणि या गोष्टी अनुभवाने/श्रद्धेने पुढे फोलो केल्या जातात. अनुभव आला अथवा केवळ बरे वटावे म्हणून पुढे चालु... 

आता काही उदाहरणे पाहा (मुद्दाम "धार्मिक" उदाहरणे टाळतो... )
१. मला "क्ष" डॉक्टरांच्याच (औषधाचा) गुण येतो म्हणून मी तिथे जातो - "अनुभव कि श्रद्धा
२. मला सकाळी शास्त्रिय संगित एकून दिवस सुरू केला की - दिवसभर मन प्रसन्न राहते - "अनुभव कि अन्धश्रद्धा?"
३. रात्री झोपताना आम्ही सगळे एकामेकाना "शुभ रात्री" म्हणून झोपातो - "बरे वाटते म्हणून कि अन्धश्रद्धा?"

हि खुप किरकोळ वाटणारी रोजच्या जीवानातील उदाहरणे आहेत - तुम्ही म्हणताल यात - श्रद्धा वा अन्धश्रद्धा कुठून आली ? वरील उदाहरणात
१. डॉक्टरां ऐवजी - देव शब्द टाका.
२. शास्त्रिय संगिता ऐवजी - भक्तिगीत शब्द टाका.
३. शुभ रात्री ऐवजी - प्रार्थना शब्द टाका.

म्हणजे मी देव / धर्म म्हणले की लगेच अन्धश्रद्धा? त्यामागचा भाव लक्षात घ्या? प्रथा/रुढी या समजून घेतल्या नाहित किन्वा काळा नुसार बदलल्या नाहित कि त्या अन्धश्रद्धा होतात/वाटू लागतात. म्हणुनाच "एखाद्या प्रथेला विज्ञानात उत्तर नाही म्हणून किंवा आपल्याला मिळाले नाही म्हणून त्यावर टीका करू नये असे माझे मत आहे...

आता रहिला मुद्दा इतर धर्मातील श्रद्धेचा -
१. रवीवारी/नाताळाला - चर्च मध्ये ब्रेड आणि वाइन मिळते - प्रसाद म्हणून - ख्रिस्ताचे रक्त असे मानतात.
२. रोजे चंद्रोदयालाच सोडतात
३, सुनता/बाप्तिस्मा झाल्यावरच मुल मुस्लिम/इसाई होते
४. पोप ची निवड झाल्या वर ते स्वताचे नाव बदलतात
५. इसाई धर्मात "संत" पद मिळवण्यासाठी "त्या" व्यक्तिच्या नावावर "दैवी चमत्काराची" नोंद आवशक असते.

अजून स्थानिक भागातील अनेक उदाहरणे मिळू शकतील... आता या त्या त्या धर्माच्या प्रथा/श्रद्धा आहेत, जो पर्यंत एखादी कृती, श्रद्धा अथवा प्रथा हि वक्ती अथवा एखाद्या समूहाच्या स्वातंत्राच्या आणि सन्मानाच्या विरुद्ध नाही (harmless) तो  पर्यंत तरी त्याला विरोध नसावा...
विरोध प्रथेला करा/ त्यातल्या सुधारणे बाबत चर्चा/प्रबोधन करा , धर्माला त्यांच्या श्रद्धेका डिवाचू नका. नाही तर सामान्य लोक नकळत कट्टरपणाकडे झुकत जातील आणि मूळ उद्देशच हरवून बसेल...